भाजप खासदार किरीट सोमय्या हे मानसिक रुग्णं झाले असून त्यांना त्वरीत वेड्यांच्या हाॅस्पीटलमध्ये दाखल करावे, अशी मागणी मुंबईतील वार्ड क्रमांक १३३ चे शिवसेनेचे नगरसेवक परमेश्वर कदम यांनी केली आहे. यासाठी त्यांनी थेट अप्पर पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी यांच्याकडे पत्र दिलं आहे. मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याचं किरीट सौमय्यांचं स्वप्नं पूर्ण होऊ शकले नाही. मनसेच्या सहा फुटीर नगरसेवकांनी पैसे घेऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलांय. तशी तक्रार त्यांनी लाचलुचपत विभागाकडे केली आहे. त्यानंतर आता फुटीर नगरसेवकांपैकी परमेश्वर कदम यांनी पोलिसांना पत्र देऊन किरीट सौमय्यांना वेडा म्हटलंय.
COMMENTS