मुंबई – ठाण्यातील वर्तकनगर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचा याचिका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली. दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पत्रकार परिषद घेत केला होता. सोमय्यांनी आधी ठाणे महापालिकेकडेही याबाबत तक्रार केली होती. यावेळी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.
ठाण्यातील वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये एसीपी पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्याशी किरीट सोमय्या यांनी आधी चर्चा केली. त्यानंतर वर्तकनगर पोलिसात सोमय्यांनी सरनाईकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्यासोबत भाजप आमदार निरंजन डावखरेही यावेळी उपस्थित होते. प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पत्रकार परिषद घेत केला होता. सोमय्यांनी आधी ठाणे महापालिकेकडेही याबाबत तक्रार केली होती.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 16 डिसेंबरला ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार दोन दिवसात त्यांनी तक्रार दाखलही केली.
“विहंग गार्डन्स ही इमारत कोणत्याही प्रकारे अनधिकृत नाही. ती इमारत संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन उभारण्यात आली आहे. त्यामुळे माझी बदनामी केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी कोर्टात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,” असे प्रताप सरनाईक म्हणाले होते. त्यानंतर आज भाजपच्या वतीने लोकायुक्ताकडे तक्रार दाखल करण्यात आली.
COMMENTS