मुंबई – भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना धक्का बसला असून ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांच्याऐवजी भाजपचे नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांना याठिकाणी भाजपने उमेदवारी देण्याचं निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज कोटक यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याने, विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डच्चू मिळाल्याचे स्पष्ट आहे. अखेर किरीट सोमय्या यांना महापालिका निवडणुकीत शिवसेनेवर टीका करणं चांगलंच भोवलं असल्याचं दिसत आहे.
दरम्यान ईशान्य मुंबईतून आपल्याला पुन्हा तिकीट मिळावं म्हणून किरीट सोमय्या यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, ईशान्य मुंबईतील स्थानिक शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला जोरदार आक्षेप घेतला. शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी तर किरीट सोमय्यांना उमेदवारी दिल्यास आपण बंडखोरी करत त्यांच्या विरोधात लढणार असल्याचाच इशारा दिला होता. त्यामुळे सोमय्या यांना भाजरनं अखेर डच्चू दिला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS