रायगड – कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनिकेत हे सुनिल तटकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्याबाबत सुनिल तटकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक घेतली असल्याची माहिती आहे.
दरम्यान कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रायगडमध्ये यावेळी राष्ट्रवादीला जड जाणार असल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेची ताकद वाढल्याने निवडणुकीत रंगत निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा लढतीत यावेळी मोठी रस्सीखेच होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे २१ मे रोजी निवडणूक होत असल्याने प्रत्येक मताचे महत्व वाढले आहे..
दरम्यान दर सहा वर्षांनी कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघात निवडणूक होते. मागच्या वेळी राष्ट्रवादीचे अनिल तटकरे यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करुन विजय मिळवला होता. आघाडीच्या सत्ता काळात रायगडमध्ये आ. सुनील तटकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, आता रायगड जिल्ह्यातील राजकारण पूर्णत: बदलले आहे. त्यात ही निवडणुक अस्तित्वाची ठरणार आहे. यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीवर त्याचे परिणाम होणार आहेत. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य मतदान करतात..
तसेच राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्यामध्ये चुरशीचा तिरंगी सामना होऊ शकतो. रायगड जिल्ह्यामध्ये शेकाप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सेनेचे २४७, भाजपचे १३५ अशी ३८२ मते आहेत. राष्ट्रवादीकडे १५५ तर काँग्रेसकडे १३३ अशी मते आहेत.
COMMENTS