कोल्हापूरचं महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे !

कोल्हापूरचं महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे !

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवार रुपाराणी निकम यांचा 11 मतांनी बोंद्रे यांनी पराभव केला आहे. शोभा बोंद्रे यांना 44 मते तर रुपाराणी निकम यांना 33 मते मिळाली आहेत.तसेच या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले यांनी माघार घेतली असून मतदानात सहभाग न घेता त्यांनी सभागृह सोडलं आहे. तसेच शिवसेनेचे इतर तीन नगरसेवकही गैरहजर होते.

दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. भाजप ताराराणी आघाडीचे उमेदवार कमलाकर भोपळे यांना महेश सावंत यांनी पराभूत केलं आहे.या निवडणुकीत महेश सावंत यांना 44 मते तर कमलाकर भोपळे यांना 33 मते मिळाली आहेत.

COMMENTS