कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का !

कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का !

कोल्हापूर – महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का बसला असून स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा पाटील पराभूत झाल्या आहेत. तर स्थायी समिती सभापतीपदी भाजप- ताराराणी आघाडीच्या आशिष ढवळे यांची निवड झाली आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण हे दोन नगरसेवक फुटल्यामुळे मेघा पाटील यांचा पराभव झाला आहे.

दरम्यान आज झालेल्या स्थायी समिती सभापती निवडीत आपलाच विजय होणार असा विश्वास काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना होता. परंतु अचानक दोन नगरसेवक फुटल्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीचा विजय झाला आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला असून नेत्यांनी डावलल्यामुळेच आपण हा निर्णय घेतला असल्याचं फुटलेल्या नगरसेवकांनी म्हटलं आहे.

COMMENTS