‘कोपर्डी’च्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया

‘कोपर्डी’च्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया

कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणात अहमदनगर सत्र न्यायालयाने तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या निकालाने पीडितेला न्याय मिळाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

सु्प्रिया सुळे  यांनी निकालाचे स्वागत करत दिलेल्या शिक्षा अंमलबजावणी लवकर व्हावी या निकालामुळे बलात्कार आरोपी शिक्षा यामुळ चांगला संदेश दिला गेला. राज्यात किमान या पुढे अशा घटना घडू नये ही अपेक्षा आहे. असे मत व्यक्त केले.

‘नराधमांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या कोपर्डीच्या निर्भयाला आज न्याय मिळाला. न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार.’ असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

कोपर्डी प्रकरणी आज न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा दिली आहे. न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे. हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा आहे. निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस सरकारने कायद्यात सुधारणा केली त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने आज सुनावलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब बसेल अशी अपेक्षा आहे. वरिष्ठ न्यायालयात हा निकाल कायम राहील आणि आरोपींची फाशीची शिक्षा कायम राहील याची जबाबदारी सरकारची आहे. यासोबत महिलांवरील अत्याचाराबाबतच्या इतर खटल्यातही जलदगतीने न्याय मिळेल यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

कोपर्डी घटनानंतर महाराष्ट्र हादरला होता. या घटनेतील आरोपींची गय केली जाणार नाही तसच दोषी आरोपीना तात्काळ शिक्षा व्हावी ही सरकारची भूमिका होती. न्याय व्यवस्थेचे आभार मानतो. फक्त त्या कुटूबातील व्यक्तीना नाही तर प्रत्येक न्यायप्रिय व्यक्तीला न्याय व्यवस्थावर विश्वास वाढेल असा निर्णय आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले.

COMMENTS