दिल्ली – राज्यसभेसाठी विचार न झाल्यामुळे नाराज झालेल्या आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी पक्षाचे अध्यक्ष यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पक्षासाठी योगदान देऊनही काहीच उपयोग झाला नाही. विविध विषयांवर पक्षामध्ये आपली प्रामाणिक मते मांडल्याचं हे मला फळ मिळाल्याचा आरोपही कुमार विश्वास यांनी केला आहे. कुमार विश्वास यांनी यातून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मोहिम उघडल्याचं पहावयला मिळत आहे. तसंच आता आपण आपली लढाई एकट्यानं लढू असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
राज्यसभेच्या दिल्ली विधानसभेच्या आमदारांमधून निवडूण द्यायच्या तीन जागांसाठी आम आदमी पक्षाने आज आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये कुमार विश्वास यांचं नाव नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहेत. आम आदमी पक्षानं संजय सिंग या पक्षाच्या नेत्यासोबतच दिल्लीचे व्यावसायिक सुशिल गुप्ता आणि एन डी गुप्ता यांना तिकीट दिलं आहे.
"सबको लड़ने ही पड़े अपने-अपने युद्ध
चाहे राजा राम हों, चाहे गौतम बुद्ध" ???? pic.twitter.com/cY2z8ikygd— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) January 3, 2018
COMMENTS