मुंबई – जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. परवा कुमारस्वामी आणि उद्धव यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कुमारस्वामी यांना शुभेच्छा दिल्या असून पालघर लोकसभा पोटननिवडणुकीच्या प्रचारामुळे शपथविधीला उपस्थित राहु शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुमारस्वामी हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदी जी. परमेश्वर हे शवथ घेणार आहेत. तर विधानसभा सभापतीपदी काँग्रेसचे के. आर. ऱमेश कुमार घेणार आहेत. तसेच जेडीएसला मुख्यमंत्री पद आणि १२ मंत्रीपदं दिली जाणार असून काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद आणि २२ मंत्री पद दिली जाणार आहेत. आज संध्याकाळी ४:३० वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान भाजपनं शपथविधी सोहळ्याला विरोधातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. हाच धागा पकडून जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) नेते कुमारस्वामी यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्नाटक मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS