बंगळुरु – जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी राज्याच्या 26व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वात आज कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार स्थापन झालं आहे. त्याचबरोबर काग्रेसच्या जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज केवळ दोनच नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. २५ मे रोजी विधानसभेत बहुमत चाचणी होईल त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना शपथ दिली.
#WATCH Opposition leaders, including Congress' Sonia Gandhi & Rahul Gandhi, SP's Akhilesh Yadav, RJD's Tejashwi Yadav, CPI(M)'s Sitaram Yechury and NCP's Sharad Pawar, with newly sworn-in Chief Minister of Karnataka HD Kumaraswamy at Vidhana Soudha. pic.twitter.com/kTnFBQ0cqC
— ANI (@ANI) May 23, 2018
दरम्यान या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, बसपा सुप्रीमो मायावती, तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, सीपीएमचे नेते सिताराम येचुरी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव या नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.
COMMENTS