काँग्रेस-जेडीएसनं सिद्ध केलं बहूमत !

काँग्रेस-जेडीएसनं सिद्ध केलं बहूमत !

बंगळुरु -कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडीनं बहूमत सिध्द केलं आहे. काँग्रेस-जेडीएस युतीला 117 मतं मिळाली असल्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार कायम राहणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत सिद्ध केलं असून बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांना 117 मतं मिळाली आहेत. यामुळे कर्नाटकमधील राजकीय नाट्यावर आज पडदा पडला आहे. बहुमत चाचणीच्या आधी विधानसभेत मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला.

दरम्यान काँग्रेस-जेडीएसनं बहुमत सिद्ध केल्यानं कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत. तसेच हे सरकार 5 वर्षे कायम राहील असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी व्यक्त केला आहे.बहुमत चाचणीआधी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचं कर्ज माफ न केल्यास भाजपा 27 मेपासून राज्यव्यापी बंद पुकारेल, असा इशारा त्यांनी दिला. सत्तेसाठी तुम्ही काहीही करु शकता, अशा शब्दांमध्ये येडियुरप्पा कुमारस्वामींवर टीका केली आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांची फाटाफूट टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे काँग्रेस आमदार शिवकुमार यांच्यावरही  जोरदार टीका केली.

 

COMMENTS