लातूर – औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षावर अपात्रतेची कारवाई !

लातूर – औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षावर अपात्रतेची कारवाई !

लातूर – औसा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्यावर नगरविकास खात्याने अपात्रतेची कारवाई करून पदावरून केलं दूर केलं आहे. स्थानिक विकास निधीचे तीन वर्षे लेखा परिक्षण न करणे, भरत सूर्यवंशी यांच्याकडे पाच महिने प्रभारी नगराध्यक्षपदाचा कार्यभार असताना एकही सर्वसाधारण सभा न घेणे, राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम अटींचे उल्लंघन करणे, नगराध्यक्षांनी पदावर असताना कर्तव्यात केलेली कसूर आदी बाबींचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांना अपात्र ठरवून पुढील सहा वर्षांसाठी नगरपरिषद सदस्य म्हणून राहण्यासही अपात्र ठरविले आहे. त्यामुळे औसा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांना मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS