मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. त्यानंतर एक्झिट पोल समोर येत आहेत. या एक्झिट पोलनुसार कोणासाठी आनंदाची तर कोणासाठी दुख:ची बातमी समोर येत आहे. या एक्झिट पोलनुसार लातूरमधील देशमुख बंधुंना धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमत आणि IPSOS च्या एक्झिट पोलनुसार लातूरमध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची मुलं अमित आणि धीरज दोघेही निवडणूक लढवत आहेत. अमित हे दुसऱ्यांदा लातूर शहरातून निवडणूक लढवत आहेत. तर धीरज देशमुख हे पहिल्यांदाच लातूर ग्रामीणमधून निवडणूक लढवत आहेत.लातूर शहरातून अमित देशमुख यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा अंदाज आहे. तर लातूर ग्रामीणमधून धीरज हे विजयी होतील अशी शक्यता आहे.
दरम्यान लातूर शहर मतदरसंघातून शिवसेनेकडून सचिन देशमुख हे मैदानात आहेत. मागील निवडणुकीत भाजपने इथं बाजी मारली होती. या निवडणुकीत सचिन देशमुख यांच्या प्रचारासाठी भाजपने ताकदपणाला लावली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपचा विजय होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
महापॉलिटिक्सचा एक्झिट पोल
दरम्यान महापॉलिटिक्सनं केलेल्या सर्व्हेनुसार लातूरमधील या दोन्ही मतदारसंघात देशमुख बंधु विजयी होतील असा अंदाज आहे. परंतु याबाबतचं चित्र निकालादिवशी म्हणजेच 24 तारखेला स्पष्ट होणार आहे.
COMMENTS