आठवणीतले वाजपेयी, राजकीय नेत्यांनी जागवल्या आठवणी !

आठवणीतले वाजपेयी, राजकीय नेत्यांनी जागवल्या आठवणी !

मुंबई – माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालं. वयाच्या 93 व्यावर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी देशभरात वा-यासारखी पसरली असून राजकीय अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच काही नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या काही आठवणी जागवल्या आहेत.

शरद पवार – अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना “पुलोद’च्या काळात जनता पार्टीच्या रूपाने वाजपेयींचे महाराष्ट्रातील सहकारी आमच्यासोबत होते. त्यावेळी बैठकीनिमित्त मी पहिल्यांदा वाजपेयी यांना भेटलो होतो.” राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याशी सततचा संपर्क होता. 1996 साली वाजपेयी यांचे 13 दिवसांचे सरकार पडले. तेव्हा मी कॉंग्रेसचा संसदीय नेता होते. या नात्याने वाजपेयी यांच्या सरकारविरोधात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मी केलेले भाषण त्यांनी शांततण ऐकून घेतले. त्यानंतर वाजपेयी यांनी राजीनामा दिला. त्या रात्री त्यांचा मला फोन आला व संसदेत केलेल्या भाषणाबद्दल त्यांनी माझे कौतुक केले. अशाप्रकारे राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक उमदा माणूस मी

पाहिला.

रावसाहेब दानवे – भाजप प्रदेशाध्यक्ष

सण 1999 मध्ये मी प्रथम खासदार झालो. अटलजी पंतप्रधान झाले. मला संसदेमध्ये संसदीय कामकाजामध्ये त्यांना जवळून पाहता आले हे मी माझे भाग्य समजतो. तसेच त्यांच्या वक्तृत्वामध्ये एक ताकद होती. जेंव्हा मी पंचायत समिती सभापती होतो. तेंव्हा प्रथम अटल जींची प्रथम भेट झाली. मी संवाद साधला राजकीय बोललो. त्यांनी एकच विचारलं कुटुंब कोण चालवत, घरी कोण कोण आहे. उदरनिर्वाह कसा चालतो इथ पर्यत त्यांनी विचारपूस केली. कार्यकर्त्यांची बारकाईनेते चौकशी करायचे.

 

धनंजय मुंडे – विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

 

सुरुवातीच्या काळात अटलजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली, जिल्ह्यातील सभांच्या नियोजनात माझा सहभाग होता, त्यांच्या एका सभेचे संचलन केले. त्यांनी सभा संपल्यानंतर आवर्जून जवळ बोलावून चांगला बोलतोस असे म्हणून पाठीवर थाप दिली होती हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही.

 

राधाकृष्ण विखे-पाटील – विरोधी पक्षनेते, विधानसभा

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आमचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेले नाणे काढण्याबाबत मागणी केली होती. वाजपेयींनी ती मागणी तातडीने मंजूर केली आणि त्या नाण्याचे नवी दिल्लीत थाटामाटात अनावरण करण्यात आले.

 

COMMENTS