सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर अजित पवार, विखे पाटील, मुख्यमंत्री काय म्हणाले ?

सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर अजित पवार, विखे पाटील, मुख्यमंत्री काय म्हणाले ?

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर काही नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या बैठकीनंतर सर्वच पक्षातील नेत्यांनी मराठा आरणाला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु यासोबतच त्यांनी सरकारकडे काही मागण्या देखील केल्या आहेत.

विखे पाटील

मागासवर्ग आयोगबाबत अहवाल लवकरात लवकर यावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. तसेच विशेष अधिवेशन बोलवावे, आंदोलनकर्ते  यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी विखे पाटील यांनी केली आहे. तसेच याबाबत काँग्रेसची सोमवारी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आलं असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

 अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी देखील बैठकीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून दुसऱ्या आरक्षणला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे ही मागणी कायम असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच विधीमंडळमध्ये मराठा आरक्षाणचा ठराव करुन, प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.  तसेच शरद पवार हे केंद्रात मदत करतील, मोदी यांनी 3/4 बहुमत मिळाल्यावर आरक्षणबाबत ठराव करावा. तसेच आम्ही मुख्यमंत्री यांना सांगितले की तुमचे सहकारी वेगवेगळी वक्तव्ये करतात. एका मिनिटात सही करणार म्हणतात. साप कोण सोडणार आहे. याबाबत दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे. संशयाचे वातावरण तयार केले जात आहे. मागे 11 मुख्यमंत्री यांनी काय केले असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच नवीन कायदा करावा लागला, बिल पास करावे लागले तर विरोधी पक्ष सरकारच्या मागे उभा राहील. तसेच आजची बैठक आधीच बोलवली असती तर बरे झाले असते. आम्ही प्रचार सोडून इथे आलो आहोत. सोमवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची बैठक झाली की आम्ही आयोगाला भेटणार असल्याचंही यावेली अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात शांतता बाळगावी, आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला केलं आहे. तसेच पोलीस महासंचालक यांना निर्देश दिले आहेत की गंभिर गुन्हे वगळता बाकीचे उपलब्ध पुरावे तपासून गुन्हे मागे घेण्यात यावेत. तसेच मराठा समाजासाठी आवश्यक खबरदारी घेऊनच सरकारी नोकर भरती केली जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

इम्तियाज जलील

मराठा आरक्षणबाबत तुम्ही बैठक घेत आहात. आयोगाचा अहवाल योग्य अचूक असावा , लवकरात लवकर न्यायालयात दाखल व्हावा अशी तुम्ही मागणी करत आहांत मग धनगर आणि मुस्लिम आरक्षणचे काय असा सवाल यावेळी आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाजाचं आरक्षण कोर्टाने मान्य केले होते,  ते तुम्ही का देत नाहीत. सरकारच्या मनात असेल तरच ही आरक्षणे लागू होतील. मराठा समजाबद्दल सरकार प्रयत्न करत आहे, मात्र धनगर – मुस्लिम समाजाची आरक्षणे सरकारला करायचीच नाहीत असा आरोपही यावेळी जलील यांनी केला आहे.

COMMENTS