उस्मानाबाद- बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर !

उस्मानाबाद- बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर !

औरंगाबाद – औरंगाबाद-बीड-उस्मानाबाद विधान परिषद निवडणूकीबाबत नगरसेवकांनी केलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर पुढील सुनावणी 6 जूनला होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला गेला आहे. या सुनावणीनंतरच या मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे 6 जुनला होणा-या पूनर्विलोकन याचिकेवरील सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.  या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

दरम्यान बीडमधील अपात्र 11 नगरसेवकांना मतदानाची मुभा देताना त्यांची मते निकालावर परिणामकारक ठरत असतील तर या निवडणुकीचा निकाल जाहीर करू नये. हा निकाल संबंधित याचिकेच्या अंतिम निकालास अधीन राहील, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्याविरोधात संबंधित नगरसेवकांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कोर्टाला निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. याचिकेवरील पुढील सुनावणी 6 जूनला होणार आहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील मतमोजणी स्थगित ठेवण्यात आली आहे.

COMMENTS