राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या जीवाला धोका ?

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या जीवाला धोका ?

रायगड – राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या जीवाला धोका असल्याचं दिसत आहे. कारण तटकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असून राष्ट्रवादी म्हसळा कार्यालयात त्यांना धमकीचे निनावी पत्र आले आहे.
पत्रात ज्या व्यक्तीकडून धोका आहे त्याचं नाव देण्यात आलं असून पूर्व वैमनस्यातून धोका असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते, मु. पो. वडगांव तांदळी, जि. अहमदनगर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची मदत घेऊन तटकरे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचे या धमकी पत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाझीम हासवारे यांनी या धमकी विरोधात म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS