लेटरहेडचा चुकीचा वापर,  राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात पोलिसांत तक्रार, चौकशीचे आदेश !

लेटरहेडचा चुकीचा वापर,  राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात पोलिसांत तक्रार, चौकशीचे आदेश !

मुंबई – लेटरहेडचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार राहुल नार्वेकर यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांच्याशिवाय त्यांचे भाऊ नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या वहिनी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्याविरोधात पदाचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी मुबंई शहरचे जिल्हाधिका-यांनी तीनही जणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लेटरहेडचा चुकीचा वापर तसंच खोट्या सह्या करुन काम केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सामजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी ही तक्रार केली आहे. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांच्या वहिनी हर्षिता या मुंबईतील वार्ड क्रमांक 226 आणि भाऊ मकरंद नार्वेकर वॉर्ड क्रमांक 227 चे नगरसेवक आहेत.

COMMENTS