बंगळुरु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून या निवडणुकीत लिंगायतांनी काँग्रेसला नाकारलं असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीआधी काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करुन मोठी खेळी केली होती. त्यामुळे भाजपचे समर्थक लिंगायत मतदार काँग्रेसकडे वळतील आणि काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु काँग्रेसचं भाकित फोल ठरलं असून भाजपनं या निवडणमुकीत बाजी मारली असल्याचं दिसत आहे.
दरम्यान लिंगायतबहुल मतदारसंघात मोठं यश मिळवत भाजपला 37 जागांवर विजय मिळू शकतो. तर काँग्रेसला केवळ 18 आणि जेडीएस 8 जागांवर समाधान मानावं लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे लिंगायतांनीच काँग्रेसला नाकारलं असल्याचं दिसत आहे. एवढच नाही तर परंपरागत काँग्रेस समर्थक मुस्लीमबहुल परिसरातही भाजपने बाजी मारली आहे. मुस्लीमबहुल दहा जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस 8 आणि जेडीएसला 7 जागांवर आघाडी मिळाली आहे.
COMMENTS