नांदेडमध्ये शिवसेना ही अशोक चव्हाणांची बी टीम – मुख्यमंत्री फडणवीस

नांदेडमध्ये शिवसेना ही अशोक चव्हाणांची बी टीम – मुख्यमंत्री फडणवीस

नांदेड –  ‘नांदेडमध्ये शिवसेना ही अशोक चव्हाणांची बी टीम आहे. काँग्रेसला फक्त पैसा खाण्यासाठी सत्ता हवी आहे.’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नांदेड महापालिकेसाठी 11 ऑक्टोबरला  मतदान होणार आहे. त्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज जाहीर सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक जोरदार हल्ला चढवला आहे.  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  नांदेडच्या  अधोगतीचं काम अशोक चव्हाणांनी केलं. काँग्रेसला विकासात नाही तर कमिशनमध्ये रस आहे. चव्हाणांनी मुंबईत फ्लॅट घेतले, पण नांदेडमधील 50 हजारांहून अधिक लोक अजूनही बेघर आहेत. मुंबईत अशोक चव्हाणांचे फ्लॅट झाले पण नांदेडच्या गरिबांना झोपडी देखील मिळाली नाही. इतकी वर्ष काँग्रेस सत्तेत होते, मग तरीही नांदेड इतकं मागास का, असा सवाल फडणवीस यांनी यावेळी केला.

COMMENTS