मुंबई – नारायण राणे काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर पुढे काय भूमिका घेतात याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज राणेंनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असून, ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे नव्या पक्षाचे नाव असल्याचे राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी नारायण राणे शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असून कंत्राटात टक्केवारी द्यावी लागते. भ्रष्टाचारामुळेच मुंबईत मराठी माणसाला घर घेता येत नाही. महापालिकेत गेल्या 25वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असल्याने उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही सराकारमधून हकलले तरी शिवसेना सत्ता सोडणार नाही. उद्धव ठाकरेंना भष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. असे राणे म्हणाले आहे.
राणेंच्या पत्रकार परिषदेतील काही ठळक मुद्दे
– शिवसेना सत्ता सोडणार नाही
– नोटबंदीवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांनी कधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध केला नाही
– सरकारमधून हकलले तरी शिवसेना सत्ता सोडणार नाही
– उद्धव ठाकरेंना सत्ता कळालीच नाही
– उद्धव ठाकरेंना चांगलं काही दिसत नाही
– उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही
– सत्तेत रहायचे, त्याचे फायदे घ्यायचे आणि टीका करायची हेच शिवसेनेचे धोरणदेशाच्या आणि राज्याच्या विकासात उद्धव ठाकरेंचे काय योगदान, नारायण राणेंचा सवाल
– बुलेट ट्रेनबद्दल मी काही बोलणार नाही, कारण विकासाला माझा कधीच विरोध नसतो
– ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’, नारायण राणेंच्या पक्षाचे नाव
COMMENTS