शेतकऱयांच्या संपाच आज शेवटचा दिवस आहे.त्यामुळे आज सरकारच्याविरोधात मौन आंदोलन केले जात आहे. शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा सुकाणु समितीच्या वतीने ठरवण्यात येणार आहे. ज्या प्रमाणे जीएसटीसाठी विशेष अधिवेशन घेतले. त्याप्रमाणे शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन घ्या अशी मागणीही या शेतकऱयांनी केली आहे. पुणतांबामध्ये मौन आंदोलन होणार असून सुकाणु समितीची बैठक होणार आहे. तसेच पिंपरीतील मेंढार गावाला राजू शेट्टी भेट देणार आहे.
Live Update
चंद्रपूर – भाजप वगळता सर्वपक्षीयांनी आयोजित केलाय शेतकरी मुद्द्यावर बंद. शहरातील गांधी चौकातून निघाला मोर्चा. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना बंदचे आवाहन करत विसर्जित झाला मोर्चा. शहरातील व्यवहार सुरळीत.
उस्मानाबाद- शेतकरी संपाला पाठींबा देण्यासाठी उमरगा येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन …पुणे हैदराबाद महामार्गावर वाहतूक विस्कळीत
सांगली – सांगली जिल्ह्यातील शेतकरी संप आंदोलनात, सहभागी असणाऱ्या सर्व पक्षीय आठ आंदोलकांना आज स्थानबद्ध करण्यात आले आहे. स्थानबद्ध करत असताना, पोलीस गाडीत, या आंदोलकांना पोलिस उपाधिक्षक धीरज पाटील यांनी मारहाण केली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.स्थानबद्ध करू नका, गुन्हे दाखल करून पोलीस कस्टडी ठेवावा, अस म्हणत आंदोलकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी आंदोलकांना पोलीस गाडीत घालण्यात आले. आणि त्यांना मारहाण करण्यात आली. सर्व आंदोलकांना स्थानबद्ध करून अज्ञात स्थळी पाठवले आहे.आज सकाळी ह्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
नंदुरबार – सत्य शोधक कष्टकरी सभेच्या वतीने नंदुरबारच्या खासदार डॉ हिना गावित आणि आमदार विजयकुमार गावित यांच्या घराला घेराव …. शेकडो कार्यकर्त्यांनी बंगल्या समोर मांडला ठिय्या….खासदार आमदार दोन्ही बाहेर असल्याने शेतकऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी बंगल्यावर कोणीच नसल्याने व्यक्त केली नाराजी
धुळे – धुळे जिल्ह्यतील साहुर येथे शेतकऱ्यांसह शिवसेनेचे बेमूदत जल आंदोलन. तापी नदीच्या पात्रात उतरून करतायेत जल आंदोलन. कर्ज माफी देऊन सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार.
शेतकरी संपाची धग सातव्या दिवशी कायम ..आज राहाता तालुक्यातील लोणी येथील आजचा आठवडे बाजार आणि बैल बाजार बंद संगमनेर तालुक्यातील साकुर येथील आठवडे बाजारही बंद
अहमदनगर – शेतकर्यांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर… पारनेर तालुक्यात तहसील कार्यालयावर काढला बैलगाडी मोर्चा… मोर्च्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी… शेतकर्यांची कर्जमाफी व्हावी तसेच स्वामीनाथन आयोग लागू करावा या मागण्यांसाठी काढला मोर्चा…
लातूर – पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या लातूर येथील घराला टाळं ठोकण्याचा शेतकरी संघटनेचा ईशारा, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घराला पोलिस छावणीचे स्वरूप.
सांगली – शेतकरी संप आंदोलनात सहभागी असणाऱ्या सर्व पक्षीय आंदोलकांना, पोलिस गाडीत मारहाण : आठ आंदोलकांना स्थानबद्ध करत असताना, पोलीस गाडीत, आंदोलकांना पोलिस उपाधिक्षक धीरज पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप
सोलापूर : शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी बांधणारे शेतकरी जन आंदोलन समितीचे 10 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
नंदुरबार : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी शेतकरी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार इथे खासदार हीना गावित, आमदार विजयकुमार गावित, काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती.
सांगली – सातव्या दिवशीही सांगलीत संप सुरूच, शेतकरी अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालय आणि घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात.
आज (7 जून) आमदार , खासदार , मंत्री यांच्या घरा समोर आणि कार्यालया समोर आंदोलन करण्याचा शेतक-यांनी इशारा दिला होता.
सांगलीच्या साखराळे येथील विजय जाधव यांच पुणतांब्यात उपोषण सुरु…. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या अस्थिकलश महाराष्ट्र भर घेवुन फिरले होते जाधव….उपोषणा दरम्यान रोज एक चमचा रक्त काढत मुख्यमंत्र्याच्या पोस्टरला लावनार भोग
पुणतांबा येथे आज गेल्या सहा दिवसा पासुन सुरु असलेला आंदोलन आज संपणार असल तरी शेतकर्यांना जागृत ठेवण्यासाठी जाधव करताय उपोषण
COMMENTS