राजकीय विरोधक म्हणजे देशद्रोही नव्हे – लालकृष्ण आडवाणी

राजकीय विरोधक म्हणजे देशद्रोही नव्हे – लालकृष्ण आडवाणी

नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त एक ब्लॉग लिहिला आहे. यांध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहेत. भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही शत्रू नव्हे, तर विरोधक मानतो. स्थापनेपासून हीच भाजपाची संस्कृती असल्याचं ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. तसेच आमच्यापेक्षा वेगळी मतं मांडणाऱ्यांना आम्ही कधीही शत्रू मानलं नाही, तसेच राजकीय विरोधक म्हणजे देशद्रोही नव्हेत असंही त्यांनी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त लिहिलेल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान 6 एप्रिलला भाजपाचा 39 वा स्थापना दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आडवाणी यांनी ब्लॉग लिहिला असून यामध्ये त्यांनी माझ्या जीवनाचे एकच तत्व राहिले आहे ते म्हणजे ‘देश प्रथम, मग पक्ष आणि नंतर मी’, असेही आडवाणी यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी या तत्वांचे पालन केले आहे आणि पुढेही करत राहील, असे नमूद केले आहे.

तसेच आडवाणी यांनी लोकांना लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. तसेच राजकीय पक्ष, प्रसारमाध्यम, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे अधिकारी आणि मतदारांना प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करण्याची ही संधी असल्याचे आडवाणी यांनी म्हटले आहे.

COMMENTS