मध्य प्रदेशनंतर छत्तीसगडमधील शेतक-यांना काँग्रेसकडून दिलासा, कर्जमाफीची घोषणा !

मध्य प्रदेशनंतर छत्तीसगडमधील शेतक-यांना काँग्रेसकडून दिलासा, कर्जमाफीची घोषणा !

रायपूर – मध्य प्रदेशनंतर आता छत्तीसगडमधील शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. सत्ता हाती येताच पहिल्याच दिवशी काँग्रेसनं शेतक-यांना दिलेलं आश्वासनं पाळलं आहे. राज्यातील शेतक-यांची सरसकट कर्जमाफी कऱण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषिकर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात दिले होते. त्यानुसार आम्ही अंमलबजावणी करत असल्याचं बघेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान छत्तीसगडमध्ये सुमारे १६.६५ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. ही कर्जमाफी एकूण ६,१०० कोटी रुपयांची असणार आहे. भूपेश बघेल यांच्या हाती सूत्रे सोपवल्याने या राज्यातील काँग्रेसमध्ये उत्साह पसरला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले भूपेश बघेल हे राजकारणातील आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यानुसार त्यांनी घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतक-यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

COMMENTS