युतीचा आणखी एक आमदार विधानपरिषदेत वाढणार?, ‘या’ ठिकाणचा निवडणूक कार्यक्रम जाहीर !

युतीचा आणखी एक आमदार विधानपरिषदेत वाढणार?, ‘या’ ठिकाणचा निवडणूक कार्यक्रम जाहीर !

मुंबई – औरंगाबाद आणि जालना येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी 25 जुलैपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट असून 19 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहेत. 22 तारखेला मतमोजणी केली जाणार आहे. या जागेवर काँग्रेसचे सुभाष झांबड आमदार होते. पण आता शिवसेनेचं पारडं जड दिसत असल्याने युतीचा आणखी एक आमदार विधानपरिषदेत वाढणार असल्याची शक्यता आहे.

या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे 101 आणि शिवसेनेचे 96 असे एकूण 197 सदस्य आहेत. अपक्ष आणि अन्य 25 हून अधिक सदस्यांचा शिवसेना, भाजपला पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे.  दुसऱ्या बाजूला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकूण 186 सदस्य आहेत. पक्षीय संख्याबळ पाहता शिवसेना, भाजपने युतीचा याठिकाणी विजय होऊ शकतो. युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्यामुळे शिवसेना या जागेसाठी कुणाला उमेदवारी देईल याबाबत उत्सुकता लागली आहे.

या निवडणुकीसाठी एकूण 656 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात 17 मतदान केंद्र असणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 9, तर जालना जिल्ह्यात 8 मतदान केंद्र असतील.
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत सामीतीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करू शकतात.

COMMENTS