काँग्रेस-राष्ट्रवादीमधील ‘या’ लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाची चर्चा पूर्ण!

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील ‘या’ लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाची चर्चा पूर्ण!

नागपूर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी केली. या दोन्ही पक्षांमध्ये गेली काही दिवसांपासून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु काही मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा काही सुटत नसल्याचं दिसत होतं. परंतु विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. काँग्रेस 7 तर राष्ट्रवादी 3 जागा लढवणार आहे.

या जागांवर ‘काँग्रेस’ लढणार

नागपूर, वर्धा, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशिम, अकोला

या जागांवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ लढणार

भंडारा- गोंदिया, बुलढाणा, अमरावती

दरम्यान वर्धा लोकसभेची जागा काँग्रेसकडे गेली आहे. परंतु या जागेवर शेतकरी संघटनेने दावा केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेनं आघाडीत सहभाग घेतला तर ही जागा काँग्रेस सोडणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS