उमेदवारी न मिळाल्यामुळे ‘हा’ काँग्रेस नेता नाराज, अपक्ष निवडणूक लढणार?

उमेदवारी न मिळाल्यामुळे ‘हा’ काँग्रेस नेता नाराज, अपक्ष निवडणूक लढणार?

मुंबई –  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही इच्छुक नेत्यांना डच्चू दिला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातही अब्दुल सत्तार यांच्याऐवजी काँग्रेसकडून सुभाष झांबडांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार नाराज झाले असून त्यांनी औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

दरम्यान या मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्यासमोर काँग्रेसकडून सुभाष झांबड हे उभे ठाकले आहेत. याठिकाणी अब्दुल सत्तार हे इच्छुक होते परंतु सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झाले आहे. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या.तयारीत आहेत. अब्दुल सत्तार जर अपक्ष लढले तर औरंगाबादमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS