नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाय्रा भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण एबीपी आणि सीव्होटर यांच्या ओपिनियन पोलमध्ये हा अंदाज वर्तवला असून भाजपच्या 51 जागा घटणार असल्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या 47 जागा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा वाढणार असल्याचा दावा पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. परंतु एबीपी आणि सीव्होटर यांच्या ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार भाजपच्या जागा घटणार असल्याचं दिसत आहे.
2014च्या तुलनेत, होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 51 जागा घटण्याची शक्यता वर्तवली जातेय, तर काँग्रेसच्या 47 जागा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामनळे भाजप नेत्यांचा हा दावा खोटा ठरणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS