राहुल गांधींना आणखी एक धक्का, उत्तर प्रदेशात सपानं सोडली साथ !

राहुल गांधींना आणखी एक धक्का, उत्तर प्रदेशात सपानं सोडली साथ !

लखनऊ  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आणखी एक धक्का बसला असून समाजवादी पार्टीने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निर्माण केलेल्या फेडरल फ्रंटला अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससला हा मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपाचा एकमेव आमदार निवडून आला आहे. मात्र या आमदाराला मंत्री न बनविल्याने अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी उत्तर प्रदेशात ताकद नसलेल्या काँग्रेसला बळ न देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

मध्यप्रदेशात आमच्या एकमेव आमदाराला तुम्ही मंत्री केलं नाहीत. त्यामुळे आमचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची टीका अखिलेश यांनी काँग्रेसवर केली आहे. तर, ‘समाजवाद्यांना बॅकवर्ड समजल्याबद्दल भाजपचेही आभार मानतो असंही अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS