लोकसभा निवडणुकीमुळे पुढच्या वर्षी आयपीएल ‘या’ देशात खेळवणार ?

लोकसभा निवडणुकीमुळे पुढच्या वर्षी आयपीएल ‘या’ देशात खेळवणार ?

सर्व काही सुरळीत पार पडलं तर पुढच्या वर्षी एप्रिल मे मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आयपीएलचं वेळापत्रकही त्याच वेळी असंत. सार्वत्रिक निवडणुकीमुळे आयपीलसाठीच्या सुरक्षा यंत्रणेवर चांगलाच ताण येतो. त्यामुळे पुढील वर्षीची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये होण्याची शक्यता आहे. बीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. काही सामने भारतात आणि ऐन निवडणुकीच्या काळातील सामने हे संयुक्त अरब अमिरातमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी देशातील क्रिकेट चाहत्यांना मैदानात जाऊन मॅचेस पाहण्याची संधी कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी 2009 मध्येही लोकसभा निवडणुकीमध्ये आयपीएलचे सर्व सामने दक्षिण अफ्रिकेत खेळवण्यात आले होते. तसंच 2014 मध्ये काही सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवले गेले होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS