लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का, ज्येष्ठ नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश ?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का, ज्येष्ठ नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते अस्वस्थ असल्याची माहिती असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अहमदनगरमधील श्रीगोंदा येथील घनशाम शेलार हे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत नगरमधून उमेदवारी मिळेल अशी शक्यता शेलार यांना होती. परंतु शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा युती होणार असल्याची दाट शक्यता असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ असून पुन्हा राष्ट्रवादीत जावे असा दबाव कार्यकर्ते त्यांच्यावर आणत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत शेलार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत त्यांना शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिले होते. परंतु काही दिवसांपूर्वीच शेलार यांना उमेदवारी देण्याबाबत नगरच्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य करण्याचे टाळले होते. तसेच शिवसेना-भाजपची युती झाली तर भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाच उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले शेलार पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS