मुंबई – लोकसभा निवडणूक 2019 मधील सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज अखेर संपली आहे. लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. मतदानानंतर आता निकाल कोणाच्या बाजूनं लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणता पक्ष सत्तेच्या खुर्चीत विराजमान होणार? याचे निकाल 23 मे रोजी स्पष्ट होणार आहेत. परंतु त्यापूर्वी विविध संस्था आणि न्यूज चॅनल्सनी एक्झीट पोल जाहीर केले आहेत. रिपब्लिकच्या एक्झीट पोलनुसार पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे.
सीव्होटर (CVoter) आणि रिपब्लिक टीव्हीचा (RepublicExitPoll) एक्झीट पोल
लोकसभा एकूण जागा 543
भाजप + मित्रपक्ष = 305
काँग्रेस + मित्रपक्ष = 124
सपा-बसपा = 26
इतर = 87
महाराष्ट्र
एकूण जागा 48
भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी इतर
विदर्भ 3 2 3 2 0
मराठवाडा 3 1 2 2 0
प.महाराष्ट्र 1 2 1 4 2
उ. महाराष्ट्र 3 2 1 2 0
मुंबई-कोकण 3 5 2 1 1
COMMENTS