मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी युती, आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. परंतु काही जागांवर अजूनही तिढा सुरु आहे. ईशान्य मुंबईत भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे प्रवीण छेडा यांचं नाव चर्चेत आहे. यासाठी छेडा यांनी मातोश्रीची वारी देखील केली. परंतु आता ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या, प्रवीण छेडा यांच्या ऐवजी भाजपकडून रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचंही नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान या मतदारसंघासाठी इतरही काही नेत्यांची नावे चर्चेत असून मनोज कोटक, पराग शाह, प्रकाश मेहता यांचीही नावं चर्चेत आहेत. त्यामुळे याठिकाणी उमेदवारी कोणाला देणार याबाबतचा सस्पेन्स कायम असल्याचं दिसत आहे.
COMMENTS