नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपदं तर एक राज्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ रचनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती असूनल शिवसेनेला दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.शिवसेनेकडून विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबई अशा सर्व विभागांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या भागातील खासदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई, विनायक राऊत, भावना गवळी यांची नावं आघाडीवर आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशात शिवसेनेचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच मंत्रिपदासह लोकसभेचे उपसभापती पदही शिवसेनेला दिलं जाण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार? मित्र पक्षांना किती जागा असणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषता जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला 2014मध्ये अवघं एक मंत्रिपद मिळालं होतं. परंतु यावेळेस मात्र शिवसेनेला दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
COMMENTS