राज्यातील 69 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र – मुख्यमंत्री

राज्यातील 69 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र – मुख्यमंत्री

मुंबई – राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी ७७ लाख अर्ज आले होते, तपासणीनंतर यातील ६९ लाख अर्ज कर्जमाफीसाठी पात्र ठरवून ते कर्जमाफीच्या पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यत आले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ट्विट करून ही नवी आकडेवारी समोर आणली आहे. शेवटच्या शेतकऱ्यांला कर्जमाफी मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील असंही मुख्यमंत्र्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

राज्य सरकारने १६ लाख ९८ हजार ११० कर्जमाफीची खाती कोरी केली असून त्यापोटी ५५८० कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर एकरकम तडजोडी अंतर्गत ६ लाख ५ हजार ५०५ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४ हजार ६७३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४१ लाख शेतकऱ्यांचा कर्ज खात्यात १४ हजार ८६४ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

https://twitter.com/CMOMaharashtra/status/938433768968220674

 

 

 

 

https://twitter.com/CMOMaharashtra/status/938432702847553536

COMMENTS