मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौ-याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत म.गो. वैद्य यांनी टीका केली आहे. युतीसाठी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला असल्याचं वैद्य यांनी म्हटलं आहे. तसेच जानेवारी महिन्यापर्यंत सरकार राम मंदिरासंबंधी अध्यादेश काढेल असे वाटत नसल्याचंही वैद्य यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने मंदिराच्या बाजून निर्णय दिला नाही किंवा हे पुढची तारीख दिली तर सरकार अध्यादेश आणू शकते असाही अंदाजही वैद्य यांनी वर्तवला आहे.
दरम्यान राम मंदिरासंबंधीचा अध्यादेश सरकार काढणार असेल तर आम्ही पाठिंबा देऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत पोहचल्यावर केलं आहे. परंतु हा अध्यादेश सरकार आणेल असे वाटत नाही असं वैद्य यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणासाठी जानेवारीतली जी तारीख दिली आहे तोपर्यंत सरकार वाट बघेल असा अंदाज असल्याचंही वैद्य यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
COMMENTS