करुणानिधींना अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी !

करुणानिधींना अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी !

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड राजकारणाचे प्रणेते मुथुवेल करुणानिधी यांचे चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आज लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत आखेरचा निरोप देण्यात आला आहे. करुणानिधी यांचे पार्थिव आज सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले होते. राजाजी हॉल येथे कार्यकर्त्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन देण्यात आलं. अंत्यदर्शनासाठी शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावल्या होत्या.परंतु समर्थक नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागला. तसेच चाहत्यांची गर्दी वाढत गेल्यामुळे याठिकाणी चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.

दरम्यान करुणानिधींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी घेतलं आहे. अभिनेता रजनीकांत, कमला हासन यांनीदेखील अंत्यदर्शन घेतलं आहे. तसेच करुणानिधींची समाधी मरीना बीचवरच होणार असून दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर मद्रास उच्च न्यायालायने हा निर्णय दिला आहे. राज्य सरकारने नकार दिल्याने हा वाद न्यायालयात गेला होता.

COMMENTS