चेन्नई – अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या शशिकला यांच्या पती पती एम. नटराजन यांचे मंगळवारी पहाटे निधन झालं आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं असून ते 76 वर्षांचे होते. एम नटराजन यांना छातीत संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. तसेच त्यांना १६ मार्च रोजी चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सोमवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज पहाटे दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाले असून रुग्णालयाने पत्रक काढून नटराजन यांच्या निधनाची माहिती दिली आहे. नटराजन यांच्यावर गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली होती. परंतु आज अखेर प्रकृती खालवल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे..
COMMENTS