माढ्यात भाजपला धक्का, माजी आमदारासह दोन नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत!

माढ्यात भाजपला धक्का, माजी आमदारासह दोन नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत!

पंढरपूर – माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण माढा तालुक्यातील माजी आमदार धनाजी साठे आणि दादासाहेब साठे भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याने माजी आमदार साठे हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या विचारात असून याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत अशी माहिती आहेत.

दरम्यान यापूर्वी साठे गट काँग्रेसमध्ये होता. परंतु २०१४ मधील निवडणुकीत काँग्रेसने डावलल्याने साठे गट भाजपमध्ये काम करत आहेत.परंतु आता ते भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे माढ्यात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS