मध्य प्रदेश – ज्योतरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार संकटात सापडले आहे. कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट आज होणार होती परंतु कोरोना व्हायरसचं कारण पुढे करत 26 मार्चपर्यंत विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासह 22 आमदारांनीही राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर कमलनाथ सरकार कोसळेल असा अंदाज वर्तवला जात होता. कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात आली होती. परंतु कोरोना व्हायरसचं कारण पुढे करत 26 मार्चपर्यंत विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
दरम्यान काँग्रेस सरकारकडे बहुमत नाही त्यामुळे कमलनाथ सरकार कोसळणार असल्याचा दावा शिवराज सिंह यांनी केला आहे. असं असलं तरीही मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्याकडे बहुमत आहे आणि त्यामुळे आपलं सरकार पडणार नाही असा दावा केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार पाडण्यात भाजप यशस्वी होणार का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS