मध्य प्रदेशात 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला मोठा धक्का !

मध्य प्रदेशात 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला मोठा धक्का !

नवी दिल्ली – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. सुरुवातीचे कल पाहता या लढतीत भाजपा पिछाडीवर आहे. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी ११७ जागांवर सध्या काँग्रेस तर भाजपा ९६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान गेल्या वर्षभरात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला पराभव स्वीकारावा लागला असल्याचं दिसत आहे. अशातच सध्या सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये भाजप मोठ्या पिछाडीवर आहे. त्यामुळे भाजपचे शिवराजसिंह चौहान यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येत असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS