मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यातल्या काँग्रे-राष्ट्रवादी महाआघाडीचं चित्र अखेर स्पष्ट झाल आहे. 48 पैकी 24 जागांवर काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर दोन्ही पक्षांनी 4 जागा आपल्या सहयोगी पक्षांना दिल्या आहेत. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन, बहुजन विकास आघाडीला एक आणि युवा स्वाभिमानीला एक जागा सोडण्यात आली असल्याची घोषणा मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चार पैकी दोन जागा दिल्या आहेत. पंरंतु या दोन जागांचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. सांगली किंवा अकोल्यापैकी एक जागा स्वाभिमानीला मिळणार असल्याची चर्चा आहे. तर बहुजन विकास आघाडीला पालघरची एक जागा सोडण्यात आली आहे. तर युवा स्वाभिमानीला अमरावतीची एक जागा महाआघाडीतून देण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
COMMENTS