मुंबई – पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या विभागाने गाढवांच्या संरक्षणाचे आदेश जिल्हाधिकाय्रांना दिले आहेत. गाढवांच्या संरक्षणांसदर्भात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक पाठवले आहे. यामध्ये त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात कुठेही गाढवांची अवैध कत्तल होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान औषध आणि इतर वापरांसाठी गाढवांच्या कत्तली होण्याचे प्रकार रज्यात वाढले असून, गेल्या अनेक वर्षांपासून गाढवांची संख्या कमालीची घटली आहे. हेच हेरुन मंत्री महादेव जानकर यांच्या पशुसंवर्धन विभागाने सर्व जिल्हाधिकऱ्यांना नोटीस पाठवून, गाढवांच्या संरक्षणाचे आदेश दिले आहेत.
COMMENTS