महादेव जानकरांनी केला ‘एवढ्या’ जागांवर दावा, घटक पक्षात तणाव ?

महादेव जानकरांनी केला ‘एवढ्या’ जागांवर दावा, घटक पक्षात तणाव ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या दोन्ही पक्षात जागावाटपाची चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 154 ते 159 जागा मिळतील तर दोन्ही पक्ष महायुतीतील मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा सोडतील, असा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला 120 जागा मिळणार असल्याचे दिसत आहेत.

जागा वाटपावरून भाजपा – शिवसेना युतीत संदिग्धता असताना युतीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपा – शिवसेना युतीमध्ये घटक पक्षांना 18 जागा सोडण्यात येणार आहेत. यात महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, विनायक मेटे यांचा शिवसंग्रामचा समावेश आहे. या चार घटक पक्षांना सोडलेल्या 18 जागांपैकी 12 जागा आपल्या पक्षाला मिळणार असल्याचा दावा महादेव जानकर यांनी केला आहे. जानकरांचा दावा खरा मानला तर उरलेल्या 6 जागा इतर तीन पक्षांसाठी उरतात. त्यामुळे जाणकारांच्या या दाव्यावरून घटक पक्षात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जाणकारांच्या या दाव्याबाबत विचारले असता सदाभाऊ खोत यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

COMMENTS