धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर महादेव जानकरांची भाषा बदलली, आंदोलकांवरच भडकले ! पहा व्हिडीओ

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर महादेव जानकरांची भाषा बदलली, आंदोलकांवरच भडकले ! पहा व्हिडीओ

इंदापूर – मराठा समाजाबरोबरच आता धनगर समाजाही आरक्षणाची मागणी करत आहे. याबाबत राज्यात काही ठिकाणी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. परंतु आंदोलन करणा-या या कार्यकर्त्यांवर रासपचे नेते आणि मत्स्य व  दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी हे भडकले असल्याचं दिसून आलं आहे. आंदोलकांनाच आता सल्लागार समितीवर नेमा, आरक्षण मिळवण्यासाठी कोणतं पेट्रोल, डिझेल लागतं हे आंदोलकांनी सांगावं, असा उपरोधिक टोला महादेव जानकर यांनी आंदोलकांना लगावला आहे. इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये महादेव जानकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान विरोधी पक्षात असताना याच महादेव जानकर यांनी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. अनेकवेळा त्यांनी धनगर आरक्षणासाठी आरपारची लढाई लढू अशी भाषा केली होती. परंतु आता जानकर यांची भाषा बदलली असल्याचं दिसत असून ते थेट आंदोलकांवर भडकले आहेत.

 

COMMENTS