मुंबई – मासळीचा दुष्काळ हा मानवनिर्मित असून त्याला मत्सोद्योगमंत्री महादेव जानकर जबाबदार असल्याचा आरोप मच्छिमारांचे नेते दामोदर तांडेल यांनी केला आहे. पर्ससीन जाळ्यांमुळे हा मासळीचा दुष्काळ निर्माण झाला आहे. पर्ससीन जाळयावर बंदी असताना देखील ससून डॉक बंदरमध्ये गेल्या दोन वर्षापासून 700 ट्रॉलर्स, भाऊचा धक्का इथे 200पर्ससीन ट्रॉलर्स सुरू आहेत. हे सर्व प्रकार महादेव जानकर यांच्या आशिर्वादाने सध्या सुरू असल्याचा आरोपही तांडेल यांनी केला आहे.
महादेव जानकर हे भ्रष्ट मंत्री आहेत. ट्रॉलर्स सुरू राहावेत यासाठी त्यांना महिन्याला 3 कोटी रुपये हप्ता मिळतो असा गंभीर आरोपही दामोदर तांडेल यांनी केला आहे. त्यामुळेच महादेव जानकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी तसेच त्यांची ईडीमार्फ़त चौकशी करण्याची मागणीही तांडेल यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांच्यावर कारवाई करुन पारदर्शक कारभाराचा आदर्श ठेवावा असंही तांडेल म्हणाले. तसेच महादेव जानकर यांची हकालपट्टी झाली नाही तर 15 दिवसात त्यांच्या बंगल्यासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
COMMENTS