मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी चार ते पाच महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणाची सत्ता येईल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. लोकसभा निवडणुकीचा कल पाहता पुन्हा एकदा युतीची सत्ता येईल असा अंदाज मांडला जात आहे. परंतु लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही युतीचा करिष्मा चालेल असं दिसत नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. लोकसभा आणि विधानसभा नवडणुकीत फरक असून राज्यातील जनता आमच्याच पाठिशी असल्याचं विरोधकांचं म्हणण आहे.
दरम्यान राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचा विचार केला असता भाजप-शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या. त्यामध्ये भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5 तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी एक जागा जिंकली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप युतीला फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकीतील अंदाज (288 जागा)
शिवसेना-भाजप युती – 226
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी – 56
इतर- 6
मुंबई (36 जागा)
भाजप-शिवसेना – 31
काँग्रेस-राष्ट्रवादी – 3
समाजवादी पार्टी – 1
एमआयएम – 1
कोकण (36 जागा)
भाजप-शिवसेना – 27
काँग्रेस-राष्ट्रवादी (बहुजन विकास आघाडीसह) – 8
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष- 1
पश्चिम महाराष्ट्र (72 जागा)
भाजप-शिवसेना – 49
काँग्रेस-राष्ट्रवादी – 23
उत्तर महाराष्ट्र (36 जागा)
भाजप-शिवसेना – 31
काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी – 5
मराठवाडा (48 जागा)
भाजप-शिवसेना – 39
काँग्रेस-राष्ट्रवादी – 6
वंचित बहुजन आघाडी-एमआयएम – 2
अपक्ष – 1
विदर्भ (60 जागा)
भाजप-शिवसेना – 49
काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी – 11
मुंबईतील लोकसभेच्या सहाही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. या सर्व उमेदवारांची विधानसभा मतदारसंघातही चलती राहिली आहे. 36 पैकी तब्बल 31 मतदारसंघात महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही मुंबईत महायुतीच्या जागा वाढतील असा अंदाज मांडला जात आहे. त्यामुळे हे अंदाज खरे ठरणार की विरोधक बाजी मारणार हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.
COMMENTS