विधानसभेच्या ‘या’ मतदारसंघात रंगणार काका-पुतण्यांचा संघर्ष !

विधानसभेच्या ‘या’ मतदारसंघात रंगणार काका-पुतण्यांचा संघर्ष !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपेक्षाही राज्यात विधानसभा निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-भाजप युतीबरोबरच आता वंचित बहूजन आघाडीही आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

त्याचबरोबर राज्यातील राजकारणात काका-पुतण्यांचा संघर्ष काही नवा नाही. आगामी निवडणुकीतही काही मतदारसंघामध्ये काका-पुतणे आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीची चर्चा चांगलीच होणार असल्याचं दिसत आहे.

बीड विधानसभा मतदारसंघ

या मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे. कारण नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले विद्यमान कॅबीनेटमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांचा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर

यवतमाळमधील पुसद विधानसभा मतदारसंघ

पुसद विधानसभा मतदारसंघातही काका-पुतण्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांना त्यांचे पुतणे आणि भाजपाचे विधानपरिषद सदस्य निलय नाईक हे आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मनोहरराव नाईक गेली अनेक वर्षे या मतदारसंघातून निवडून येत आहेत. त्यांचा याठिकाणी मोठा जनसंपर्क आहे. या मतदारसंघात अनेकांनी त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता परिवारातील सदस्यानं आव्हान दिल्यास ही निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे.

किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघ

या मतदारसंघातही काका-पुतण्यामध्ये रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे. कारण या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांना त्यांचे पुतणे आणि शिवसेनेचे विधानसभा संघटक सचिन नाईक आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. प्रदीप नाईक गेल्या 15 वर्षापसून किनवट-माहूर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मात्र, विधानसभेत मतदारसंघातील समस्यांबाबत आवाज उचलत नसल्याची मतदारांची तक्रार आहे. तर, दुसरीकडे सचिन नाईक हे राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे मेव्हणे आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूकही रंगतदार होऊ शकते असा अंदाज आहे.

COMMENTS