सभागृहात फडणवीस म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना ओळखतो, ते दिलेला शब्द पाळतील! “

सभागृहात फडणवीस म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना ओळखतो, ते दिलेला शब्द पाळतील! “

नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शेतकय्रांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याचीच आठवण भाजपने करुन देताना, ‘सामना’च्या बातमीचं कात्रण पोस्टररुपात झळकावून, भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती, मग आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना 25 हजाराची मागणी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी केली आहे. तसेच उद्धवजींना मी ओळखतो, ते आमच्यासोबत होते तेव्हापर्यंत ते शब्द पाळत होते. आता उद्धव ठाकरे शेतकरी मदतीची, 25 हजार हेक्टरी देण्याचा शब्द पाळतील असंही फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान या सरकारनं शेतकय्रांच्या तोंडाला पानं पुसली असून त्यांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच अधिवेशनातील सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकय्रांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.पुरवणी मागण्यांमध्ये हेक्टरी 25 हजार रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकारची भावना नाही, असा आरोप फडणवीसांनी केला.

तसेच सामनात खूप आणि सभागृहात चूप अशी शिवसेनेची भूमिका असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला.

COMMENTS