फडणवीसांच्या सुचक विधानाने महाविकास आघाडीत सन्नाटा

फडणवीसांच्या सुचक विधानाने महाविकास आघाडीत सन्नाटा

मुंबई: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. पण सरकार स्थिर होत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी सुचक विधान केंद्राने विधानसभा अध्यक्षाची निवडीसाठी महाविकास आघाडीमध्ये सस्पेंस तयार झाला आहे.

एकीकडे महाविकासआघाडीमध्ये नाराजी असतानाच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिना-भाईंदर येथील कार्यक्रमात राजकीय उलथापालथाचे संकेत दिले आहेत. आम्ही फासे पलटवणार, शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि राज्यात सगळ्यात कमी आमदार असलेला पक्ष काँग्रेस सरकारला पाठिंबा देत सत्तेत आहे. भाजप सगळ्यात मोठा पक्ष असूनही त्याला विरोधी पक्षात राहावं लागलं आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याचं मत फडणवीसांनी मांडलं.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक घ्यावी लागणार आहे. यावरून सामनामधून नाराजी व्यक्त करण्यात आली. ‘काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल’, असं सामनामध्ये लिहिण्यात आलं आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाला संधी द्यायची, याबाबत महाविकास आघाडीत पुन्हा चर्चा होणार आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलताना आमच्याशी चर्चा केली. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचं होतं, ते आता खुलं झालं आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदावर होणाऱ्या आगामी नियुक्तीबाबत नवा सस्पेन्स तयार केला आहे.

COMMENTS